जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे काम सुरु

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे काम सुरु

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

येथील जिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लाँट उभारण्यात येत आहे. त्यापैकी एका प्लाँटचे काम पूर्णत्वास आले आहे. एक ऑक्सिन प्लाँट पुढील आठवड्यात तर दुसरा 15 दिवसात सुरु होणार आहे. दोन्ही प्रकल्पामुळे जिल्हा रुग्णालयाला 260 जम्बो सिलींडर ऑक्सिजन रोज मिळणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी 60 सिलींडरच्या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत आहे. करोना विलगीकरण कक्षाच्या बाहेर हा प्रकल्प आहे. प्रकल्पासाठी सिमेंटचा ओटा तयार केला आहे.

या ओट्याच्या चारही बाजूला जाळी बसविण्यात आली आहे. तर बाह्य रुग्ण विभागाच्या मागे पाण्याच्या टाकीजवळ एक प्रकल्प उभारण्यात येत आहे.

करोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अगोदर दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिजनची गरज प्रचंड प्रमाणात निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com