मदनी हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन

आ. फारूख शाह यांनी केली मदत
मदनी हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

आ.फारूक शाह यांनी करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील मदनी हॉस्पिटलला नवीन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन देण्यात आले.

शहरात कोरोना बाधित रुग्णांसाठी जमियत-ए-उलमा हिंद यांच्यातर्फे मदनी हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी शहरातील नागरिक उपचार घेऊन बरे होत आहेत. याठिकाणी मागच्या आठवड्यात आ. फारूक शाह यांनी भेट देत रुग्णांची चौकशी केली होती.

यावेळी आ. शाह यांनी स्वत:हून मदनी हॉस्पिटलला नवीन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन देण्याचे सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज जमियत-ए-उलमा हिंदचे अध्यक्ष मुफ्ती कासीम जिलानी यांच्याकडे सदरचे नवीन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन देण्यात आले.

यावेळी जमियत-ए-उलमा हिंद चे अध्यक्ष मुफ्ती कासीम जिलानी, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार शाह, अन्सारी जमील अहमद, रिजवान, शाहिद शाह, डॉ.शाहिद शेख, आसिफ पोपट शाह, कैसर पेंटर, स्वीय सहाय्यक निलेश काटे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com