धुळ्यात डेंग्यू, मलेरियाचा उद्रेक

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष, उपाययोजना न केल्यास शिवसेना आंदोलन करणार
धुळ्यात डेंग्यू, मलेरियाचा उद्रेक

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व मलेरिया Dengue and malaria आजाराने थैमान घातले आहे. परंतू याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने Municipal Health Department दुर्लक्ष केल्यामुळे दोन्ही आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अनेक वेळा तक्रारी करुनही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. या दोन्ही आजारासह साथीच्या आजारानेही डोके वर काढले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरीत उपाययोजना कराव्यात अन्यथा शिवसेना Shiv Sena तीव्र आंदोलन agitation करेल असा इशारा उपमहानगरप्रमुख ललित माळी Lalit Mali यांनी दिला आहे.

शहरात गेल्या एक महिन्यापासून डेंग्यू, मलेरिया आणि साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. त्यातच आता व्हायरल फ्ल्यूने डोकेवर काढले आहे. परंतू याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख ललित माळी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरासह देवपूर परिसरात डेंग्यू व मलेरियाने थैमान घातले असून याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. डेंग्यू व मलेरिया नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना अद्याप महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या नाहीत. पावसाळ्यापुर्वी डास उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करायला हव्या होत्या. परंतू त्याबाबत नियोजन करण्यात आलेले नाही.

शहरासह देवपूर परिसरात दोन महिन्याच्या कालावधीत डेंग्यू व मलेरियाचा फैलाव झाला आहे. या दोन्ही आजाराचे रुग्ण वाढले आहेत. प्रौढांसह लहान बालके या आजाराने बाधीत आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधे व उपचार मिळत नसल्याने रुग्ण प्रचंड खर्च करुन खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे.

आरोग्य विभागाच्या जबाबदार अधिकार्‍यांना सत्ताधारी व काही नगरसेवक पाठीशी घालत आहेत. डेंग्यू, मलेरियाच्या आजारासाठी लाखोंची बिले काढली जात आहेत. नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. परंतू याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

मागील एक महिन्याच्या कालावधीत 193 नमुन्यांपैकी 53 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 535 हा केवळ शासकीय आकडा आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी असावी असेही पत्रकात म्हटले आहे. महापालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे येणार्‍या काळात डेंग्यू व मलेरिया रुग्ण संख्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. डेंग्यू या आजारावर निश्चित औषधी व उपाययोजना नाहीत. डेंग्यू हा जीव घेणा आजार आहे. त्यामुळे त्वरीत महापालिकेने उपाययोजना करावी. कारण कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा सामना करतांना डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने योग्य ती दखल घ्यावी. अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा उपमहानगरप्रमुख ललित माळी यांनी दिला आहे.

व्हायरल फ्ल्यूच्या रुग्णांमध्येही वाढ

शहरात डेंग्यू, मलेरिया व साथीचे आजार फैलावले असतांना आता व्हायरल फ्ल्यूने देखील डोकेवर काढले आहे. अनेकांना व्हायरल फ्ल्यूचा त्रास जाणवत आहे. ताप, डोकेदुखी, सर्दी, पडसे, खोकला आदी आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. तापाच्या रुग्णांनी अनेक खासगी दवाखाने फुल्ल आहेत. या साध्या आजारावरही नागरिकांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. परंतू महापालिकेच्या काही दवाखान्यांमध्ये या आजारावरील औषधाचा साठाही उपलब्ध नाही.

नागरिक महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधांसाठी भटकत आहेत. परंतू त्यांना औषधे उपलब्ध होत नाहीत. एकीकडे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधाचा साठा उपलब्ध असल्याचा दावा आरोग्य विभाग करत आहेत. परंतू हा दावा फोल ठरतांना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत दखल घेवून पुरेशा प्रमाणात औषधाचा साठा उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.

महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये काहीवेळा वैद्यकीय अधिकारी देखील जागेवर नसतात. त्यामुळे रुग्णांना तिष्टत बसावे लागते. अन्यथा तेथील कर्मचारीच रुग्णांना औषध देवून त्यांना घरी पाठविले जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com