धुळे। प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असून रविवारी 24 तासात फक्त सहा बाधीत आढळून आले आहेत.

शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील दोन, एसीपीएम लॅबमधील एक आणि खाजगी लॅबमधील तीन असे सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 14 हजार 288 वर पोहचली आहे. रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी स्वत: स्वत:ची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, सोशल डिस्टिन्स आणि हात धुवावे या तीन सुत्रीचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.