मध्यम प्रकल्पांत केवळ 34 टक्केच जलसाठा

धुळे जिल्ह्यातील स्थिती; जोरदार पावसाची प्रतीक्षा
मध्यम प्रकल्पांत केवळ 34 टक्केच जलसाठा

धुळे Dhule । प्रतिनिधी

श्रावण महिना संपण्यात आला असून अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस Satisfactory rain fall झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 34 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखे पर्यंत 70 टक्के जलसाठा निर्माण झाला होता. काही प्रकल्प Water project ओसंडून वाहत होते. मात्र यावर्षी अत्यंत बिकट स्थिती आहे. त्यामुळे सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा Waiting for heavy rain लागून आहे.

जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासून पावासाचे अल्प प्रमाण राहिले आहे. त्यामुळे प्रकल्पांमध्येही जलसाठा कमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नकाणे तलावातही साठा कमी आहे. दरम्यान जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्पात फक्त 34.65 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. मागील वर्षी 70.87 टक्के जलसाठा निर्माण झाला होता. लाटीपाडा, मालनगाव आणि जामखेडी, कनोली हे चार प्रकल्प शंभर टक्के भरले होते.

मात्र या वर्षी अत्यंत दैयनिय स्थिती आहे. साक्री तालुक्यातील लाटीपाडा प्रकल्प 72.33 टक्के, मालनगाव 67.61 टक्के, जामखेडी 100 टक्के, कनोली 78.70 टक्के, अनेर 54.60 टक्के भरले आहे. तर सोनवद प्रकल्पात फक्त 1.60 टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर बुराई प्रकल्पात 18.65 टक्के, अक्कलपाडा 16.1 टक्के, करवंद 38.77 टक्के, वाडीशेवाडी 30.74 टक्के, अमरावती 27.6 टक्के तर सुलवाडे प्रकल्पात 40.80 टक्के जलसाठा आहे. 12 मध्यम प्रकल्पात 35.25 टक्के जलसाठा आहे. गत वर्षी 70.87 टक्के जलसाठा निर्माण झाला होता. जिल्ह्यातील 47 लघु प्रकल्पात 20.67 टक्के जलसाठा आहे. गत वर्षी 91.01 टक्के जलसाठा होता.

तर पाणी टंचाईचे सावट- शहराला पाणी पुरवठा करणारा नकाणे तलाव मागील वर्षी जुलै महिन्यातच शंभर टक्के भरुन ओंसडून वाहत होता. यंदा मात्र ऑगस्ट महिना संपत आलेला आहे. आता पर्यंत फक्त 15.74 टक्के एवढा अल्प जलसाठा आहे. तर अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात मागील वर्षी 40.13 टक्के जलसाठा निर्माण झाला होता. तर यंदा फक्त 16.1 टक्के जलसाठा आहे. चांगला पाऊस न झाल्याने पाणी टंचाईचे सावट निर्माण होवू शकते.

323 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत 323 मीमी एवढा पाऊस झाला आहे. त्यात धुळे तालुक्यात 379.3 मीमी पाऊस अपेक्षित होता. त्या पैकी आतापर्यंत 378.3 म्हणजेच 99.7 टक्के पाऊस झाला आहे. तर साक्री तालुक्यात 343.5 मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात 342 मीमी म्हणजेच 99.6 टक्के पाऊस झाला आहे.

तर शिरपूर तालुक्यात 495.2 मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात 258.2 मीमी पाऊस झाला आहे. शिरपूर तालुक्यात तब्बल 48 टक्के पावसाची तुट आहे. शिंदखेडा तालुक्यात 382.2 मीमी पाऊस अपेक्षीत होता. तर प्रत्यक्षात 285.5 मीमी म्हणजेच 74.7 टक्के पाऊस झाला आहे. शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात पावसाची तुट अधिक आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com