पिंपळनेर उपबाजार समितीत कांदा लिलाव सुरू, 1375 रूपये भाव

पिंपळनेर उपबाजार समितीत कांदा लिलाव सुरू, 1375 रूपये भाव

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

येथील उपबाजार समितीत आज कांदा लिलाव सुरू झाल्याने कांद्याने 1 हजार 375 रुपये प्रतिक्विंटल भाव घेत उच्चांक गाठला आज बाजारात 105 वाहनांचा लिलाव करण्यात आला.

साधारणतः दीड ते दोन महिन्यांनंतर पिंपळनेर उपबाजार समितीत कांदा लिलावासाठी आज जेबापूर रोड लगत असलेल्या पटांगणात कांदा लिलाव करण्यात आला.

यावेळी 105 वाहने दाखल झाली होती. सकाळी 11 वाजता कांदा लिलाव सुरु होऊन कांद्याला 1 हजार 375 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

मोथ्री 600 ते 800 प्रतिक्विंटल भाव मिळाला असून सरासरी 1000 ते 1100 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाला.

उपबाजार समितीने यावेळी शेतकर्‍यांना आवाहन केले की, लिलाव होऊन प्रत्येक वाहनाला पाच हजार रुपये रोख व उर्वरित रक्कम ही त्या दिवसाचा धनादेश देण्यात येईल.

तसेच दहा हजार रुपयांपर्यंत असलेली खरेदी अशा शेतकर्‍यांना रोख स्वरूपात रक्कम देण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांनी आपला माल ज्या व्यापार्‍यांना विक्री केला आहे, अशा व्यापार्‍यांकडून त्याच तारखेला धनादेश देणे आवश्यक आहे.

तरी शेतकर्‍यांनी धनादेश ताब्यात घेणेबाबत शेतकर्‍यांच्या काही तक्रारी असल्यास त्या उपबाजार समितीत द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी सचिव अशोक मोरे, शाखाप्रमुख भूषण बच्छाव, संजय बाबा आदींसह व्यापारी प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com