धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरात धारदार हत्यारांनी वार करत एकाचा निर्घृण हत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

विशाल माणिक गरूड (वय 43 रा. आंबेडकर चौक, अमरनगर, धुळे) असे मयताचे नाव आहे. मध्यरात्री सव्वा बारा ते एक वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात कारणावरून अज्ञात ठिकाणी त्यांच्या तोंडावर तिक्ष्ण हत्यारांनी वार करून त्याचा गंभीर जखमी करून खून केला.

काँग्रेसभवन समोर परिसरातील नागरिकांना एक जण गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला. त्याला पोलिसांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.

याप्रकरणी योगेश पंडीत पगारे (रा.आंबेडकर चौक, अमरनगर) याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असल्याचे कळते.