बोराडीत सांस्कृतिक भवनासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून देणार

आदिवासी विकास मंत्र्यांचे आश्वासन
बोराडीत सांस्कृतिक भवनासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून देणार

बोराडी Boradi । वार्ताहर

आदिवासी भागातील बोराडी Boradi हे गाव केंद्र बिंदू आहे. म्हणून Tribal बांधवासाठी सांस्कृतिक भवनासाठी cultural building एक कोटीचा निधी व आदिवासी मुलांच्या वस्तीगृह व तालुक्यातील आश्रमशाळेना इमारत बांधकामासाठी देखील लवकरात निधी मंजूर करून देऊ, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी Tribal Development Minister K.C. Padvi यांनी येथे दिले.

बोराडी येथील देवमोगरा कॉलनीत आदिवासी विकास महामंडळ, नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या विद्यमाने खावटी अनुदान योजना 2020-2021 अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूचे किट वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ना.के.सी. पाडवी, जि.प. चे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, आ.काशिराम पावरा यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले.

ना.पाडवी पुढे म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांनी शेतकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनुसूचित जमातीच्या कुटूबीयांना सन 1978 पासून खावटी कर्ज देण्याची सुरुवात केली होती. सन 2013 ला बंद झालेली ही खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, लॉकडाऊनमुळे कामे बंद असल्याने अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यामुळे त्याची उपासमार थांबवण्यासाठी मी योजना कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर मांडून यावर्षी खावटी अनुदान मंजूर करून पुन्हा सुरू केले आहे. आता खावटी योजना हे कर्ज स्वरूपात नसून ती अनुदान स्वरूपात मिळणार आहे. तसेच या योजनेत रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत, तर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील साडेबारा लाख आदिवासी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच यासोबतच शासनाने मोहा फुलावरील बंदी उठवली असून त्यावर आधारित उद्योगनिर्मिती करण्याची योजना राबवून जंगलव्याप्त परिसरातील महिला, युवकांना रोजगार देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. काशीराम पावरा, जि. प.चे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिशे, नंदुरबार आदिवासी विकास महामंडळ अधिकारी श्रीमती प्रतिभा पवार, शुभांगी शिरसाठ, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंग पावरा, माजी जि.प.सदस्य रणजीतसिंग पवार, सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, शि.सा.माजी चेअरमन व्ही.यु.पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयवंत पाडवी, रमन पावरा, जगन पावरा, सी.के.पाडवी, हारसिंग पाडवी, सिताराम पाडवी, अ‍ॅड.गोवाल पाडवी, मनोहर पाटील, भिमराव मोरे, राजकुमार पावरा आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात सहा.जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, दि.22 मार्च 2020 पासून कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. परंतु लाकडाउनमुळे कामे बंद असल्याने अनुसूचित जमातीच्या कुटुंबिंसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला असून त्यासाठी धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात एकूण 70 हजार 595 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येऊन ऑनलाइन अर्ज भरण्यात आले होते. यापैकी 65 हजार 546 लाभार्थ्यांचा अर्जांवर अ‍ॅप्रोवल देऊन त्यांना खावटी अनुदान वाटप करण्यात येत आहे. उर्वरित अर्जांवर देखील विचार करून त्यांनाही लवकरच अनुदान देण्यात येईल. तसेच 58 हजार 276 लाभार्थ्यांना बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा झालेले आहेत. तर उर्वरित लाभार्थ्यांनाच्या खात्यावर रक्कम वर्ग करणे सुरू आहे.

या प्रसंगी आ.काशिराम पावरा, माजी जि.प. सदस्य रणजीतसिंग पवार, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आदिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डी.आर.पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com