लग्नानंतर दुसर्‍याच दिवशी नववधु रफुचक्कर

लग्नानंतर दुसर्‍याच दिवशी नववधु रफुचक्कर

धुळे Dhule। प्रतिनिधी

लग्न झाल्यानंतर After getting married दुसर्‍याच दिवशी नववधु रफुचक्कर bride Rafuchakkar झाली असून फसवणूक Cheating केल्याप्रकरणी चौघांवर तालुका पोलिसात taluka police गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रविंद्र पांडुरंग पाटील (वय 34 वडगाव ता. धुळे) या सेंट्रींग कामगाराने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा चौघांनी गैरफायदा घेतला. जंग्गु शंकर पगारे, सुनिल शंकर कोळी (रा. जुने धुळे) व एक भारती नामक महिला यांनी फिर्यादीचे ज्योती राजेंद्र शिंदे (रा. मालेगाव) हिच्याशी लग्न लावून देण्याचा विश्वास संपादन केला.

लग्न लावून देवून त्यासाठी फिर्यादीकडून 1 लाख 10 हजार रूपये घेतले. मात्र लग्न झाल्यानंतर एका दिवसातच मुलगी घरातून निघुन गेली. त्यावरून वरील चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. तपास उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com