कत्तलीसाठी बांधुन ठेवलेल्या नऊ गुरांना जिवदान दोघांना अटक

चाळीसगाव रोड पोलीसांची कारवाई, ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त
कत्तलीसाठी बांधुन ठेवलेल्या नऊ गुरांना जिवदान दोघांना अटक

धुळे | प्रतिनिधी Dhule

शहरातील फिरदोस नगरात कत्तलीसाठी बांधुन ठेवलेल्या नऊ गोवंश जनावरांना चाळीसगाव रोड पोलिसंनी जिवदान दिले. ७५ हजार रुपये किंमतीचे एकुण ९ गुरे पोलीस पथकाने ताब्यात घेत त्यांना तात्पुरते संगोपनासाठी नवकार गोशाळा येथे जमा करण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील फिरदोस नगर येथे महापालिकेच्या ओपन स्पेस समोर कंपाऊंडच्या आत गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी बांधुन ठेवलेल असल्याची गुप्त माहिती सपोनि संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शोध सुरू केला. तेव्हा फिरदोस नगरातील स्वेस ऊर्दु शाळेजवळ कंपाऊंडच्या आतमध्ये जनावरांचा आवाज येत असल्याने तेथे जनावरे बांधलेले आढळून आले. जनावरांजवळ दोन जण उभे होते.

पोलीस आल्याचे पाहुन ते पळू लागल्याने त्यांना पोलीसांनी जागीच पकडले. चौकशीत त्यांनी खलील अन्सारी नियाज अहमद अन्सारी (रा. घर नं २५१६ हसन मंजील गल्ली नं १४ माधवपुरा, धुळे) व फाईम अख्तर जलील अहमद अन्सारी (रा. पालाबाजार, माधवपुरा) अशी दोघांची नावे सांगितली.

पोलिसांनी ७५ हजार रुपये किंमतीचे एकुण ९ गोवंश जनावरे जप्त केली. त्यांना तात्पुरते संगोपनासाठी नवकार गोशाळा येथे जमा करण्यात आली.

याबाबत पोकॉ शरद जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोना रविंद्र वाघ हे करीत आहेत. ही कारवाई सपोनि संदीप पाटील, पोसई योगेश ढिकले, विजय चौरे, पोहेकॉ अजिज शेख, पोना भुरा पाटील, पोकॉ मुक्तार शाह, पोकॉ हेमंत पवार, पोकॉ शरद जाधव यांच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com