शिरपुरात विवाहितेची आत्महत्या
धुळे

शिरपुरात विवाहितेची आत्महत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शहरातील काझी नगरात विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. विवाहिता ही भाड्याने काझी नगरात राहत होती.चेतना दुर्गादास पाटील (वय 32) असे मयत विवाहितेच नाव आहे.

तिचा पती हा शाहपूर येथे वनविभागात नोकरीला आहे. तो सुट्टी असली की, शिरपूर येथे येत असे. चेतनाला एक आठवीत असलेला मुलगा आहे. मुलाला कालच त्याचे वडील बाहेर गावाला घेऊन गेले होते. त्यामुळे चेतना ही घरात एकटीच होती.

सकाळी नऊ वाजता तिला तर्‍हाडी येथील नातेवाईक भेटायला गेले असता दरवाजा बंद आढळला. दरवाजा उघडत नसल्याने घरात पाहिले असता चेतना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आली.

चेतनाचे माहेर हे तर्‍हाडी येथील असून तिने बी.ए.बी.एडचे शिक्षण घेतलेले होते. तिचे सासर हे अमळनेर तालुक्यातील आस्टाणे येथील आहे.

Deshdoot
www.deshdoot.com