नव्याने 88 पॉझिटिव्ह ; एकाचा मृत्यू
धुळे

नव्याने 88 पॉझिटिव्ह ; एकाचा मृत्यू

एचडीएफसी बँकेत पुन्हा 2 रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून आज 88 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यात एचडीएफसी बँकेत पुन्हा 2, मनपात 1, पोलिस क्वार्टरमधील एका रूग्णाचा समावेश आहे. तर सकाळी शासकीय दूध डेअरी परिसरातील 66 वर्षीय पुरुषाचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची रूग्ण संख्या 3 हजार 139 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 हजार 982 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण मृत्यू 108 जणांचा मृत्यू झाला आहे.

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 64 अहवालांपैकी 21 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात देशमुख नगर 1, डालडा घरकुल 1, सुलवाडे शिंदखेडा 1, नंदुरबार चौफुली दोडाईचा 1, महमंदीया नगर दोंडाईचा 1, पिंपळ चौक 1, विद्यानगर 1, दाऊळ ता. शिंदखेडा 2, भोई गल्ली, शिंदखेडा 1, बडगुजर गल्ली, शिंदखेडा 1, शिवराजे चौक दोंडाईचा 1, निमगूळ ता. शिंदखेडा 1, वणी ता. शिंदखेडा 1 व शिंदखेड्यातील तीन रूग्णांचा समावेश आहे.

साक्री तालुक्यातील भाडणे येथील सीसीसी केंद्रातील 11 अहवालांपैकी 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात कर्मवीर नगर, साक्री 2, न्हावी नगर, कासारे 1, घोडयामाळ पिंपळनेर 1 व हस्ती बँक पिंपळनेर येथील पाच रूग्णांचा समावेश आहे.

महापालिका पॉलिकेक्निक सीसीसी केंद्रातील 117 अहवालांपैकी 22 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात जुने धुळे 3, मनपा 1, विखे नगर 1, कुमार नगर 2, मिलिंद होसिंग सोसायटी 1, सुशील नगर 1, गल्ली नंबर 14 मध्ये 4, गल्ली नंबर 12 मध्ये 2, विधी महाविद्यालय 2, एचडीएफसी बँक 2, पोलीस पोलीस हेडक्वॉटर 1, नटराज टाकी 1 व साक्री रोडवरील एका रूग्ण आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 75 अहवालांपैकी 26 अहवाल धुळे जिल्ह्यातील व 2 इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात 80 फुटी रोड 1, नगाव 1, शिंदखेडा 1, शासकीय दूध डेअरी 1, नवलनगर 1, माधवपुरा 1, सुभाष नगर 1, सोनगीर 1, जय मल्हार कॉलनी 1, शिंदखेडा 1, शिरपूर 1, रावेर 1, साक्री रोड 1, एलआयसी कॉलनी 1, जितेंद्र नगर 1, देवपूर 1, सेवा हॉस्पिटल 3, अनिरुद्ध नगर 1, धुळे 6, पारोळा 1 व औरंगाबाद येथील एका रूग्णांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयातील रॅपिड अँटीजन टेस्टच्या 46 अहवालांपैकी 10 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात कुसुंबा 3, सोनगीर 3, धुळ्यातील चार रूग्ण आहेत. जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 3 हजार 139 वर पोहोचली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com