धुळे जिल्हा परिषदेच्या 15 जागांवर नव्याने निवडणुका होणार

सुप्रीम कोर्टाने दिलेत आदेश, राजकीय समीकरणे बदलणार
धुळे जिल्हा परिषदेच्या 15 जागांवर नव्याने निवडणुका होणार

धुळे । प्रतिनिधी Dhule

येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काढण्यात आलेल्या आरक्षणावर हरकत घेण्यात आल्याने आता 15 जागांवर नव्याने निवडणुक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती यासाठी लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण पाटील यांनी दिली.

मागील वर्षी धुळ्यासह अकोला, वाशीम, नंदुरबार आणि नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. यासाठी काढण्यात आले आरक्षण 73 टक्क्यांपर्यंत गेले. यावर हरकत घेऊन ते 50 टक्क्यांच्या आत असावे, अशी मागणी करणारी याचिका प्रकाश धुडकू भदाणे यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

सर्व बाजूंचा विचार करता कोर्टाने ही मागणी मान्य करून 15 जागांवर नव्याने निवडणूक घेतांचे आदेश दिलेत, असे श्री पाटील यांनी सांगितले.

ओबीसींना फटका

जिल्हा परिषदेच्या या वाढीव आरक्षणाचा फटका ओबीसी प्रवर्गाला बसणार आहे.

कारण राज्य शासनाच्या नियमानुसार या प्रवर्गाचे 27 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता ओबीसी च्या जागा कमी होणार असल्याने या प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे पद रद्द ठरणार आहे. यात धुळे तालुक्यातील 11 तर शिंदखेडा तालुक्यातील 4 सदस्यांचा समावेश आहे.

मात्र पंचायत समितीसाठी जिल्हा भरातील ओबीसी जागांवर निवडणूक होईल, असेही श्री.पाटील म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com