ध्रुवी भागडिया व हिमांशू गिंदोडियाला टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकूट

ध्रुवी भागडिया व हिमांशू गिंदोडियाला टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकूट

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

येथील नवकार स्पोर्ट्स अकॅडमी येथे रोटा टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 78 खेळाडूनी वेगवेगळ्या वयोगटात सहभाग घेतला. या स्पर्धेत ध्रुवी भागड़िया आणि हिमांशु गिदोडिया यांनी उत्कृष्ठ खेळी करून दुहेरी मुकुट प्राप्त केले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण टेबल टेनिसच्या जेष्ठ खेळाडू सौ मंजिरीताई पंडित, प्रथमेश गांधी, डॉ. जीवन पवार आणि राकेश जैन यांचा हस्ते झाले.

वयोगट 10 वर्ष मुले, खुश भागड़िया, आयुष अहिराव, वयोगट 12 वर्ष मुले, यश जैन, खुश भागड़िया, वयोगट 14 वर्ष मुले, ध्रुवी भागड़िया- देवांश गिंदोडिया, वयोगट 14 वर्ष मुली, ध्रुवी भागड़िया, मुद्रा सदाने, वयोगट 16 वर्ष मुले, हिमांशु गिदोडिया, युग अग्रवाल, वयोगट 18 वर्ष मुले, हिमांशु गिदोडिया- युग अग्रवाल, मेन्स कुणाल मेहता, संजय सदाने हे विजेता खेळाडू आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com