निवृत्त शिक्षकाच्या जमिनीचा परस्पर व्यवहार, 5 जणांसह अधिकार्‍यांवर गुन्हा

निवृत्त शिक्षकाच्या जमिनीचा परस्पर व्यवहार, 5 जणांसह अधिकार्‍यांवर गुन्हा
देशदूत न्यूज अपडेट

धुळे Dhule। प्रतिनिधी

सेवानिवृत्त शिक्षकाच्या ( retired teacher) शिरपूरातील जमिनीचा परस्पर व्यवहार (transaction of land) करून फसवणूक करणार्‍या पाच जणांसह भुमि अभिलेखच्या )(land records) तत्कालीन अधिकारी व कर्मचार्‍यांवर (officers) शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल (crime) करण्यात झाला आहे.

दगडू न्हानु कोळी (वय 85 रा. वरवाडे ता. शिरपूर हमु. चांदगड ता. शिंदखेडा) या सेवानिवृत्त शिक्षकाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या नावे असलेली शिरपूर शहरातील सि.स नं 1553 मधील एकुण क्षेत्र 2154.4 चौ.मी ही जमीन कोळी धुळे वर्ग 6 ची क सत्ता प्रकारची नवीन शर्तीची आहे. तिची खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार जिल्हाधिकार्‍यांच्या पुर्वपरवानगी शिवाय होत नाही.

असे असतांना देखील प्रभाकर गुलाब कोळी (रा. अंतुर्ली), केशव वेडू सावळे (रा. शिरपूर), रविंद्र इघन सावळे (रा. वरूळ), बन्सीलाल ओंकार ईशी (रा. अंतुर्ली), गोपाल भिकचंद अग्रवाल (रा. शिरपूर) यांनी भुमि अभिलेख कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत केले.

बनावट मिळकत पत्रिका तयार करून त्याआधारे सदर जमिनीचा मोठ्या रक्कमेचा व्यवहार करून शासनाचा महसुल बुडवून निवृत्त शिक्षकासह शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकाँ मालचे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com