धुळ्यात वृद्धाचा खून; संशयिताला अटक

लॉकडाऊनमुळे दुकानातील साहित्य देण्यास नकार
धुळ्यात वृद्धाचा खून; संशयिताला अटक

धुळे । प्रतिनिधी Dhule

लॉकडाऊनमुळे दुकानातील साहित्य देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून शहरातील कुमार नगरात वृद्धाचा खून केल्याची घटना काल रात्री घडली. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत नवीन वासुदेव दर्यानानी (वय 35, रा. घर नं.131कुमार नगर,शिवधाम मंदिराजवळ, साक्री रोड, धुळे) या शिक्षकाने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घराजवळच त्यांचे वडील वासुदेव नारायणदास ( वय 76) यांचे दुकान आहे. त्यांनी लॉकडाऊनमुळे दुकान उघडून साहित्य देण्यास मनोज ताराचंद तुलसानी (रा.ब्लॉक नं.ओ-9, कुमारनगर, साक्री रोड,धुळे) याला नकार दिला. त्याचा राग येवून मनोज याने वासुदेव नारायणदास यांना हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

छातीवर, पोटावर, पाठीवर मारहाण करुन मनोजने वासुदेव नारायणदास यांचा खून केला. तसेच नवीन दर्यानंद यांना देखील मारहाण केली. काल रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मनोज तुलसानी यांच्या विरोधात शहर पोलिसात भादंवि 302, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तपास सपोनि संतोष तिगोटे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com