५० रुपयांसाठी तरुणाचा खून
धुळे

५० रुपयांसाठी तरुणाचा खून

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

किराणा मालाचे 50 रुपये न दिल्यामुळे तरुणाला लाकडी दांडा व काठीने मारहाण करुन तरुणाची हत्या केल्याची घटना मोरदड तांडा येथे उघडकीस आली आहे. याबाबत चार जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परशुराम आनंदा चव्हाण (वय34) हे मृताचे नाव आहे.

दि. 17 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता मोरदड तांडा येथे किराणा दुकानातून परशुराम याने किराणा माल घेतल्यानंतर 50 रुपये दिले नाहीत. म्हणून रघुनाथ चव्हाण, प्रेम दंगल चव्हाण, भिकन दंगल चव्हाण, दंगल काशिनाथ चव्हाण यांना राग आला.

त्यामुळे रघुनाथ, प्रेम आणि भिकन या तिघांनी लाकडी दांडक्याने परशुरामला मारहाण केली. तर दंगल चव्हाण याने काठीने मारहाण केली. या मारहाणीत परशुराम गंभीर जखमी झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला.

याबाबत साहेबराव आनंदा चव्हाण यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 302, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे रघुनाथ चव्हाणसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com