धुळ्यात तरुणाचा खून
धुळे

धुळ्यात तरुणाचा खून

मृताचा सख्या मामासह पाच जणांना अटक व कोठडी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील चाळीसगाव रोड परिसरात मामासह त्यांच्या मुलांनी भाच्याला हाताबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने वार करत त्याचा खून केल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

अब्दुल बाशीत अब्दुल्ला खान (वय 20) असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत युवकाचे वडील अब्दुल्ला आतीकुर रहेमान खान (रा. जामचा मळा, मुल्ला कॉलनी, धुळे) यांनी चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील चाळीसगावरोडवरील साबीर शेठ यांच्या कॉम्प्लेक्सजवळ अब्दुल रज्जाक लियाकत खान, इमरान खान अब्दूल रज्जाक खान, पल्लू अब्दुल रज्जाक खान, इकराम रज्जाक खान व इजार उर्फ राजा रज्जाक खान सर्व (रा. मुल्ला कॉलनी, चाळीसगावरोड, धुळे) यांनी तुझ्या वडीलांनी मिटींग का घेतली या कारणावरुन यांनी मुलगा बाशीत यास पकडुन हाताबुक्यांनी मारहाण केली. तर इमरान खान अब्दूल रज्जाक खान याने त्याच्या हातातील चाकूने मुलगा बाशीत याचे पोटाचे मागील बाजुस चाकुने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर पाच ही जण पसार झाले.

नातेवाईकांनी बाशिदला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी वरील पाच जणांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वरील पाच संशीयतांमधील रज्जाक हा मयताचा मामा तर इतर रज्जाक याचे मुले आहेत.

या घटनेमुळे काल रात्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्हा दाखल होताच चाळीसगाव रोड पोलिसात संशीयतांची धरपकड सुरू केली. सकाळपर्यंत चार जणांना तर सायंकाळी फरार झालेल्या अब्दूल रज्जाक लियाकत खान यालाही अटक करण्यात आली. चौघांना दुपारी न्यायालयात हजर केले असता 14 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे हे करीत आहेत.

असा झाला वाद

साबीर शेख यांच्या कॉम्पलेक्समागे दारूसलाम मशीद समोर दि. 9 रोजी रात्री साडेनऊ वाजता मिटींग होती. त्यात फिर्यादी अब्दूला अतिकुर रहेमान खान याच्यासह इतर जण हजर होते.

त्यावेळी अब्दूल रज्जाक लियाकत खान याने, तुम्ही मशीदमध्ये नमाज पठणासाठी आल्यानंतर सोशल डिस्टंन्सींग ठेवले नाही तर मी मशीदला कुलुप लावेल असे सांगितले.

त्यावर मशील कोणाचीही नाही, असे अब्दूला खान यांनी सांगीतले असता त्यांचा मुलगा ताहिर यास इकराम खान रज्जाक खान याने धमकी देवून हाताबुक्यांनी मारहाण केली. तेव्हा उपस्थितांनी वाद मिटविला.

त्यानंतर बाशिदसह तिघे भाऊ साहिद हॉटेल येथील सोफेचे कारखाना येथे झोपण्यासाठी निघुन गेले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पाच जणांनी बाशिदवर हल्ला केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com