तरुणाचा गळा आवळून खून ; नंदुरबारच्या महिलेला अटक

शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा शिवारातील घटना
तरुणाचा गळा आवळून खून ; नंदुरबारच्या महिलेला अटक
Crime news

धुळे । प्रतिनिधी Dhule

शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा शिवारात तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी समोर आली. याप्रकरणी नंदुरबार येथील महिलेसह तिच्या साथीदारांवर नरडाणा पोलिसात काल गुन्हा दाखल केला.

दरम्यान काल सायंकाळी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. याबाबत तरुणाची आई भारतीबाई प्रकाश कोळी (रा.शिवाजी चौक, पोस्ट ऑफिस गल्ली, खेतीया ता.पानसेमल जि.बडवानी, मध्यप्रदेश) यांनी नरडाणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय मनोज ठाकरे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com