जात, धर्म न पाळता माणुसकी जोपासली
धुळे

जात, धर्म न पाळता माणुसकी जोपासली

करोनाबाधित 100 जणांवर मनपा सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव व त्यांच्या टीमने केले अंत्यसंस्कार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule :

शासकीय कर्तव्य पार पाडतांनाही माणूसकीच्या नात्यातून कोणतीही जात, धर्म, न पाहता तसेच रात्र-पहाटेची चिंता न करता आजतागायत कोरोनामुळे मृत झालेल्या शंभर जणांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी निष्ठेने महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव व त्यांच्या टीमने पाळली.

मी या काळात इतक्या इतक्या मृतदेहांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अंत्यसंस्कार केले, असे तुम्ही म्हटले तर त्याला अभिमानाच्या वर्गवारीत टाकायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होतो. जिथे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार देखील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्याच माणसाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार देत होते, दूर पळत होते. तेथे कोणीतरी परकी माणस त्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत होते आणि पार पाडताहेत. त्यांनी खर्‍या अर्थाने माणूसकीचा धर्म पाळला आहे. ते आहेत महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव व त्यांची टीम.

कोरोना बाधितावर अंत्यविधीसाठी येणारी अडचण लक्षात घेवून आयुक्त अजीज शेख यांनी श्री.जाधव व त्यांच्या टीमवर या कामाची जबाबदारी सोपविली. सुरुवाती पासूनच अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी तेवढ्याच निष्ठेने आजतागायत पेललेली आहे. स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता या संपूर्ण टीमने शंभर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोणत्याही स्वरुपात मृतदेहाची हेळसांड होवू न देता अंत्यत धार्मिक पध्दतीने व विधीपूर्वक अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली. त्यांना अनेक चांगल्या-वाईट अनुभवातून जावे लागले. परंतु जाधव व त्यांची टिम खचलेली नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com