आयशरच्या धडकेत मोटरसायकस्वार ठार

आयशरच्या धडकेत मोटरसायकस्वार ठार

अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून पसार

शिरपूर । प्रतिनिधी

तापी नदी पुलाजवळ आयशरच्या धडकेत तालुक्यातील सांगवी येथील मोटारसायकल स्वार ठार झाल्याची घटना आज दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. जयराम आनंदा कोकणी (वय 56 रा.सांगवी) असे मयताचे नाव आहे.

मोटारसायकल स्वार शिरपुर कडुन मोटरसायकलने शिंदखेड्याकडे जात असतांना तापी नदीच्या पुला जवळील सुकवद येथील वळणावर शिंदखेड्याकडुन शिरपुरच्या दिशेने येणार्‍या आयशर वाहनाने मोटरसायकलीला समोरुन धडक दिली यात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला आहे.

मोटरसायकल चालकाच्या पिशवीतील आधार कार्डावरून ओळख पटली असून सदर मोटारसायकल स्वार सांगवी येथील जयराम आनंदा कोकणी असे नाव समोर आले आहे. तर अपघातानंतर आयशर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पळुन गेला.

अपघाताची माहिती शिंदखेडा पोलिसांना दिल्याने घटनास्थळी शिंदखेडा पोलीस दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com