चार मंडळांत शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस

शिरपूर तालुक्यात दमदार; शेतांमध्ये साचले पाणी
चार मंडळांत शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस

तर्‍हाडी Tarhadi। वार्ताहर

शिरपूर तालुक्यात गायब झालेला पाऊस rain 17 ऑगस्टपासून परत आला आहे. गेल्या 48 तासात तालुक्यातील सर्वच मंडळात दमदार पाऊस Heavy rain झालेला आहे. चार मंडळात तर 48 तासात शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

शिरपूर तालुक्यात यावर्षी जूनपासूनच चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. जुलै महिन्यात काही दिवस तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. यात काही मंडळात तर 17 ऑगस्ट अगोदर जेमतेम सरासरी 100 मिलिमीटर पाऊस झालेला होता. त्यामुळे तालुक्यात सर्वदूर पावसाची आवश्यकता होती. बागायती पिके काही प्रमाणात तग धरून होती. मात्र कोरडवाहू पिके वाया गेलेली आहेत. त्यामुळे निदान रब्बी हंगामात तरी फायदा होईल. त्यामुळे तालुक्यात पावसाची प्रतीक्षा होती. दि. 17 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपासून तालुक्यात पावसाला सुरूवात झाली.

त्या दिवशी दिवसभर व रात्री चांगला पाऊस झाला. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजीही पाऊस सातत्याने सुरू आहे. शिरपूर तालुक्यात पावसाला 48 तास पूर्ण झाले आहेत. 48 तासात तालुक्यात सर्वच मंडळात दमदार पाऊस झालेला आहे.त्यामुळे काही प्रमाणात बळीराजा सुखावला आहे.

17 ऑगस्ट रोजी तालुक्यात सातही मंडळात चांगला पाऊस झालेला होता. सर्वात जास्त पाऊस शिरपूर मंडळात जवळपास तब्बल 94 मिलिमीटर एवढा पाऊस झालेला होता. तर सांगवी मंडळात सर्वात कमी 40 मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. 17 ऑगस्ट रोजी शिरपूर, थाळनेर व बोराडी या मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी पाऊस सातत्याने सुरू आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. नाल्यांना पाणी आले आहे. वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. उशिरा का असेना मात्र तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. बळीराजाच्या चेहर्‍यावर समाधान दिसते आहे.

दोन दिवसातील पाऊस

दि.17 व 18 ऑगस्ट रोजी दोन दिवसात शिरपूर मंडळ 150 मिलिमीटर, थाळनेर मंडळ 114 मिलिमीटर, होळनांथे मंडळ 100 मिलिमीटर, अर्थे मंडळ 87 मिलिमीटर, जवखेडा मंडळ 75 मिलिमीटर, बोराडी मंडळ 101 मिलिमीटर व सांगवी मंडळात 61 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com