दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

मृत मोहन मराठे यांच्या कुटुंबियांना आ. जयकुमार रावल यांच्यातर्फे 15 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

आज आ. रावल यांनी मोहन मराठे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, माजी विरोधी पक्षनेते विजय मराठे, दिलीप जाधव, बांधकाम सभापती निखिल जाधव, राजू जाधव, नरेंद्र कोळी, श्री.शेळके, कुलदीप गिरासे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ.रावल म्हणाले की, मोहन मराठे यांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा म्हणून पहिल्या दिवसांपासून प्रयत्न सुरू असून त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला. याचा तपास लवकरच पूर्ण होऊन दोषींवर कारवाई करण्याचे संबंधितानी सांगितले आहे.

त्याच्या परिवाराला शासनाने देखील मदत द्यावी अशी भूमिका आमची असून याबाबत अधिवेशनात देखील प्रश्न मांडणार असल्याचे आ.रावल यांनी यावेळी नमूद केले.