मोहाडी पोलिसांनी गुरांची अमानुष वाहतूक रोखली

ट्रकसह पावणे सात लाखांचा मुद्येमाल जप्त, चालकासह दोघे ताब्यात
मोहाडी पोलिसांनी गुरांची अमानुष वाहतूक रोखली

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

राजस्थान कडून औरंगाबादकडे होणारी गुरांची अमानुष वाहतूक मोहाडी पोलिसांनी रोखली. चाळीसगाव रोडवरील ट्रकला पकडण्यात आले. चालकासह सहचालकाला ताब्यात घेण्यात आले असून ट्रकसह पावणे सात लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र.211वरुन राजस्थान येथुन धुळेमार्ग औरंगाबाद येथे ट्रकमधून (क्र.आर.जे 06 जी.बी 8813) गोवंशाची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती सपोनि योगेश राजगुरु यांना मिळाली.

त्यांच्यासह पोहेकॉ दाभाडे, पोकॉ शिरसाठ, वाघ यांनी आज पहाटे एक वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोडवरील हॉटेल 55555 जवळ सापळा लावला. ट्रक दिसताच चालकाला साईडला थांबविण्याचा इशारा केला.

वाहनाच्या मागे लावलेल्या लाकडी पाटया उचकावुन पाहीले असता 10 गायी व 4 बछड्यांना निदर्यपेण कोंबलेले दिसुन आले. वाहन चालक त्याचे नाव विचारता त्याने त्याने छोटुखान शकुर शहा (वय 36, रा.जुलापुरा ग्राम तहसील हुरडा जि.भिलवाडा) व क्लिनरने सुभान ईस्माईल शहा (वय 45, रा.कानिया ग्राम ता.हुरडा जि भिलवाडा, राजस्थान) असे सांगितले.

दोघांना ताब्यात घेत एकुण 5 लाख 60 हजार रूपये किंमतीचा ट्रक व 1 लाख 16 हजार रूपये किंमतीचे गुरे असा एकुण 6 लाख 76 हजार रूपयांचा मुद्येमाल करण्यात आला. 14 गुरांची सुटका करत त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले. याप्रकरणी मोहाडी पोलिसात चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.