कॉल लोकेशनवरुन पकडले 19 मोबाईल चोरटे

कॉल लोकेशनवरुन पकडले 19 मोबाईल चोरटे

देवपूर भाजीबाजार, बुध बाजार, शाळा, कॉलेज, बसस्टॅण्ड येथून चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील देवपूर भाजीबाजार, बुध बाजार, शाळा, कॉलेज, बसस्टॅण्ड येथून चोरीस गेलेले मोबाईल कॉल लोकेशनवरुन शोधण्यास देवपूर पोलिसांना यश आले असून सदर 19 मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आले आहेत.

शहरातील देवपूर परिसरातील भाजीबाजार, बुध बाजार, शाळा, कॉलेज, बसस्टॅण्ड या ठिकाणाहून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांनी चोरीस गेलेल्या मोबाईलचा छडा लावण्याबाबत सूचना दिल्या.

त्यानंतर सपोनि चंद्रकांत बी. पाटील, पोहेकॉ डी.डी.पाटील, पोकॉ एस.पी. बोडके, व्ही. एस. अखडमल, पोकॉ एस.एस. सुर्यवंशी यांचे पथक तयार केले. या पथकाने कॉल लोकेशननुसार चोरीस गेलेले 19 मोबाईल दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचे शोधून काढले. त्यानंतर सदर मोबाईल त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com