मनविसेचे ‘कुंभकर्ण जगाओ’ आंदोलन
धुळे

मनविसेचे ‘कुंभकर्ण जगाओ’ आंदोलन

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. परंतू शासन केवळ आश्वासन देत आहे. प्रत्यक्षात रोजगाराची कुठलीही संधी उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे झोपेत असलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज जुन्या महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कुंभकर्ण जगाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले होते. आंदोलनकर्त्यांनी टाळ वाजवून झोपी गेलेल्या कुंभकर्णाला अर्थात शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांचा रोजगार गेला आहे. नोकरी गेल्याने अनेक तरुण तणावाखाली आले असून भविष्याची चिंता सतावत असल्याने अनेकांनी मृत्यूला कवटाळले आहे. रोजगार निर्मितीबाबत शासन केवळ आश्वासन देत आहे. मात्र प्रत्यक्षात कृती अंमलात येत नाही. लॉकडाऊननंतर ऑनलॉक करण्यात आले.

मात्र स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यात आलेले नाही. परप्रांतीयांना नोकरी मिळते मात्र स्थानिक बेरोजगार आहेत. रोजगाराच्या प्रश्नावर शासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. यामुळे मनवि सेनेने कुंभकर्ण जगाओ आंदोलन केले. या आंदोलनामुळे महापालिका चौक दणाणला होता.

या आंदोलनात मनवि सेनेचे अ‍ॅड. प्रसाद देशमुख, गौरव गीते, यश शर्मा, हर्षल परदेशी, प्रशांत व्यवहारे, ओम कासार, नयन देवरे, विठ्ठल पगारे, शामक दादाभाई, सकलीन शेख, चेतन पाटील, गोपाल सोनवणे, पुरुषोत्तम पाटील, योगेश जोशी, सत्यविजय गिरासे, ज्ञानेश्वर भदाणे, कुणाल भामरे, मनोज कोळी, गुरुराज पाटील, राहूल मराठे, आदेश सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com