आ.प्रविण दरेकरांच्या पोस्टरला मारले जोडे

धुळ्यात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे वक्तव्याचा निषेध, आ.दरेकरांनी माफी मागावी
आ.प्रविण दरेकरांच्या पोस्टरला मारले जोडे

धुळे Dhule। प्रतिनिधी

भाजपाचे (BJP) विधान परिषदेचे (Legislative Council) विरोधी पक्ष नेते (Leader of Opposition) प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी शिरूरमधील (पुणे) जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल (NCP)व महिलांबद्दल (women) आक्षेपार्ह विधान (Offensive statement) केले. ते त्यांची व सुसंस्कृत म्हणवून घेणार्‍या भाजपाची बौद्धिक दिवाळखोरी व बौद्धिक दारिद्र जगजाहीर करणारे आहे.

आ.प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महिलांची जाहीर माफी मागावी, नाही तर त्यांना काळे फासले जाईल असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या धुळे जिल्हा महिला आघाडीने (NCP Women's Congress) दिला आहे. धुळ्यात आ.दरेकरांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले.

जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम यांच्यासह युवती जिल्हाध्यक्षा हिमानी वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष मालती पाडवी, जिल्हा कार्याध्यक्ष सरोज संजीवनी पाटील, शहर कार्याध्यक्ष तरूणा पाटील, विधानसभा अध्यक्ष धुळे तालुका माधुरी पाटील, जिल्हा सरचिटणीस सरोज पवार, युवती कार्याध्यक्षा चेतना पाटील, शारदा भामरे, रेखा सूर्यवंशी, वनिता गरुड व वर्षा सूर्यवंशी आंदोलनात सहभागी होत्या.

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि.13 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात आ.प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष, जाहीर निषेध करतो. तसेच ते धुळे जिल्हा दौर्‍यावर कधी आलेच तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस आ.दरेकर यांचे तोंड काळे फासून रंगविल्याशिवाय राहणार नाही.

सत्त्ता गेली की कसे वैफल्य येते हेच भाजपा आणि या पक्षाचे नेते असलेल्या आ.दरेकर यांच्या विधानावरून लक्षात येते. त्याच्या वैफल्यातून ताळतंत्र, पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा सुसंस्कृतपणा सोडून आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवताना महिला वर्गाचाही आदर राखला नाही असे दिसून येत आहे.

यावरून आ.दरेकर यांच्या रूपाने त्यांच्या बेताल- आक्षेपार्ह विधानावरून भाजपा वैचारिकतेचा, सुसंस्कृतपणाचा आव आणत असते तो बेगडी व दिखाव्यापुरताच असतो असे स्पषपणे दिसून येत आहे, असे सांगतांनाच आ.दरेकरांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही आंदोलन कर्त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com