पालकमंत्री अब्दुल सत्तार उतरले रस्त्यावर...

पालकमंत्री अब्दुल सत्तार उतरले रस्त्यावर...

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

दिवसेंदिवस करोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेवून महाराष्ट्र शासनाने राज्यभर 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन जारी केला आहे. यात आता पुन्हा 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातही याची सक्त अंमलबजावणी होत असून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज धुळे शहरातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर पायी फिरुन लॉकडाऊनच्या परिस्थितीची पहाणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., मनपा आयुक्त अजिज शेख या प्रमुख अधिकार्‍यांसह फौजफाटा उपस्थित होता.

मनोहर सिनेमा थिएटरपासून ते महात्मा गांधी चौक, लेनीन चौक यासह बाजारपेठेच्या रस्त्यांची पहाणी करण्यात आली. तसेच अधिकार्‍यांसोबत बैठक घेवून खबरदारीच्या उपायांचा आढावाही घेतला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com