पालकमंत्री अब्दुल सत्तार धुळे जिल्ह्याच्या दौर्‍यावर

पालकमंत्री अब्दुल सत्तार धुळे जिल्ह्याच्या दौर्‍यावर

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार शुक्रवार 30 एप्रिल 2021 पासून धुळे जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत.

पालकमंत्री श्री. सत्तार यांचा दौरा असा : शुक्रवार 30 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता गुलमोहर, शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन, व राखीव. दुपारी 4.00 वाजता खरीप हंगाम आढावा बैठक, सन 2020-21, सायंकाळी 5.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे कोविड -19 संदर्भात आढावा बैठक, सायंकाळी 6.00 वाजता पोलिस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा, त्यानंतर सोयीनुसार पोलिस अधीक्षक कार्यालय, धुळे येथून गुलमोहर, विश्रामगृह, धुळे कडे प्रयाण, राखीव व मुक्काम.

शनिवार 1 मे 2021 सकाळी 7.45 वाजता गुलमोहर, शासकीय विश्रामगृह, धुळे येथून जिल्हाधिकारी कार्यालय, धुळेकडे प्रयाण, सकाळी 7.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे आगमन, सकाळी 8.00 वाजता महाराष्ट्र दिनाच्या जिल्हास्तरीय ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे, त्यानंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन, राखीव व सिल्लोडकडे प्रयाण.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com