मोहाडी उपनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह

आयोजकांसह वर्‍हाडींवर गुन्हा दाखल
मोहाडी उपनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह
file photo

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरातील मोहाडी ( Mohadi) उपनगरात अल्पवयीन मुलीला विवाह लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आयोजकांसह वर्‍हाडी, ब्राम्हण, फोटोग्राफरवर गुन्हा दाखल झाला आहे.

नागरी प्रकल्प कार्यालयाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी (Child Development Project Officer), मुख्यसेविका अनिता रंगराव पाटील (वय 50 रा. पोर्णिमा नगर, धुळे) यांनी मोहाडी पोलिसात (Police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोहाडीतील 17 वर्षीय मुलगा व शहरातील अल्पवयीन मुलीचा विवाह त्यांचे दोघांचे आई-वडील तसेच मुलीचे तिघे भाऊ यांनी घडवून आणला. तसेच दि.16 फेब्रुवारी रोजी मोहाडी उपनगरात विवाह (Marriage) समारंभात लोकांची गर्दी करून आदेशाचे उल्लंघन केले. त्यावरून मुलीचे आई, वडील व मुलाचे आई-वडील व तिन भाऊ यांच्या विरोधात भादंवि कलम 188, 269 सह बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 9, 10, 11 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोना गहीवड करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com