महाराष्ट्रातील पहिले कापूस खरेदी केंद्र!

आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला शुभारंभ
महाराष्ट्रातील पहिले कापूस खरेदी केंद्र!

शिंदखेडा । प्रतिनिधी Dhule

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा हे महाराष्ट्रातील पहिले सीसीआय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ भाजपचे आ.जयकुमार रावल यांच्याहस्ते करण्यात आला.

सन 2020-21 या वर्षातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना आज दिलासा मिळाला आहे आज वर्धमान जिनिग प्रेसिगला कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले त्याचे उद्घाटन आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते कापसाचे पूजन करून करण्यात आले. प्रसंगी मार्केट कमिटीचे चेअरमन नारायण भाऊसाहेब पाटील व सर्व संचालक जीपचे उपाध्यक्ष कामराज निकम, शिंदखेडा नगरपंचायत गटनेते अनिल वानखेडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देसले, दोंडाईचा येथील विक्रम पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.खैरनार, शिवसेनेचे सर्जेराव पाटील, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, पीआय दुर्गेश तिवारी, पवार दीपक, चौधरी, सुभाष माळी, माजी जी.प.सदस्य जयसिंगप्पा गिरासे यासह अनेक नेते उपस्थित होते वर्धमान जिनिगचे टाटीया बंधू यांचा सहभाग होता.

शेतकर्‍यांच्या वतीने प्रा. प्रदीप दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले शेतकर्‍यांच्या प्रश्नणकडे लक्ष देऊन सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन केले. तर गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धत अवलंबिली तीच पद्धत याही वर्षी राबवली तर पारदर्शकता राहील.

मार्केटचे सभापती नारायण पाटील म्हणाले सीसीआय ने सांगितल्यास गेल्या वर्षाप्रमाणे ओनलाईन पद्धत राबवू असे आश्वासन दिले.

कापूस खरेदी उद्घान मनोगतात आ.जयकुमार रावल म्हणाले, गेल्या वर्षी शिंदखेडा सीसीआय केंद्रात तीन लाख 28 हजार टन कापूस खरेदी केला. त्यापोटी 171 कोटी रुपये खर्च केला गेलात. वर्षी व महाराष्ट्रात सर्वात शेवटी हे केंद्र बंद झाले. शेतकर्‍यांचे हित साधण्याचाच प्रयत्न झाला. गेल्या काळात बुराई परिक्रमा करून ठिकठिकाणी बंधारे बांधून आज बुराई बारमाही झाली. त्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचा लाभ मिळाला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने योजना अंमलात आणली. मात्र त्यास नकोत्या पद्धतीने विरोध दर्शवून बदनामी करण्याचे षड्यंत्र राबविले जात आहे. याचा विचार शेतकर्‍यांनी केला पाहिजे. स्वतः पिकवलेला शेतमाल देशात कुठेही विकू शकतो ही योजना यात आहे.

रस्ते चौपदरीकरणाचा उल्लेख आ रावल यांनी केला त्यावर केंद्र सरकारकडून ना.गडकरीनकडून निधी मंजूर करून घेतला असून रस्त्यांचाही प्रश्न मार्गी लावला आहे. यासह अनेक मुद्यांवर विचार व्यक्त झाले मार्केट कर्मचार्यांबाबत त्यांनी प्रशन्सनीय उद्गार व्यक्त केले. आज शिंदखेडा व दोंडाईचा मार्केट यार्डात सुमारे एकशे साठ कापसाची वाहने आली आहेत, असाही उल्लेख त्यांनी केला सूत्रसंचालन प्रा.गिरासे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com