धुळ्यात विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई

धुळ्यात विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरात विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.करोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील नागरिकांची वर्दळ कमी व्हावी म्हणून शहरातील पुल सार्वजनिक वापरासाठी बंद करण्यात आले.

तरीही इतर रस्त्यांनी नागरिक शहरात ये-जा करीत असल्यामुळे आज पोलिसांनी सकाळपासूनच देवपूरातील सावरकर पुतळा व आग्रा रोडसह साक्री रोडवर नागरिकांची कसुन तपासणी केली.

त्यात विनाकारण फिरणार्‍यांना रोखत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून त्यांचे चित्रीकरणही करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना पाहुन अनेकांनी लांबूनच यु र्टन घेतला.

सावरक पुतळा चौकात सपोनि चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पथकाने कारवाई केली.

तर निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह कर्मचार्‍यांनी आग्रारोड, साक्रीरोडवर तपासणी मोहिम राबविली. शहरातील अन्य भागातही पोलीसांनी नागरिकांची तपासणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com