जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा लिसिल डेव्हलपर्सला दणका

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा लिसिल डेव्हलपर्सला दणका

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने लिसिल डेव्हलपर्स लि.ला दणका दिला असून तक्रारदार महिलेला रक्कम व त्रासापोटी खर्च देण्याचा आदेश दिला आहे.

कासारे ता. साक्री येथे राहणार्‍या सुनंदा उर्फ सुगंधा कानडे या महिलेने परिवाराच्या भविष्यासाठी लिसिल डेव्हलपर्स लि. या कंपनीच्या पॉलिसी एजंट मीना संजय जाधव यांच्यातर्फे दरमहा तीन हजार रुपये गुंतवणूक 36 महिन्यांसाठी केली.

मुदतीनंतर एक लाख आठ हजार व त्यावरील व्याज असे एक लाख 42 हजार 20 रुपये मिळणार होते. मात्र मुदत संपुणही ठेवीची रक्कम सुनंदा कानडे यांना मिळाली नाही.

त्यामुळे अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव यांच्यातर्फे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीचे निवारण होवून कानडे यांना एक लाख 42 हजार 20 रुपये व त्यावरील 9 टक्के व्याज तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चासाठी पाच हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायधिश व्ही. के. शेवाळे व सदस्य एस.एस. जोशी यांनी दिले. तक्रारदारातर्फे अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव व अ‍ॅड. ए.एस. बेहेरे यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com