वीज पडून 12 मेंढ्या ठार

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

विखरण शिवारात मेंढ्यांच्या वाड्यावर वीज कोसळून बारा मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामुळे एक लाख 44 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विखरण शिवारातील गट क्रमांक 276 मध्ये बापू भिला ठेलारी यांच्या शेतात मेंढ्यांचा वाडा होता. काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा फटका मेंढ्यांना बसला. वीज कोसळून बारा मेंढ्या जागीच ठार झाल्या.

सदर मेंढ्यांची अंदाजे किंमत एक लाख 44 हजार रुपये असून सदर सदर घटनेचा पंचनामा तलाठी व पशुधन विकास अधिकारी आर. जी. चिंचोले यांनी प्रत्यक्ष जागेवर केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com