आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रातील परवानाधारकांनी शस्त्रास्त्रे जमा करावी !

जिल्हादंडाधिकारी संजय यादव : जि. प., पं. स. पोटनिवडणूक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणार्‍या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुक प्रक्रिया मुक्त व नि:ष्पक्ष वातावरणात पार पडावी म्हणून निवडणूक आचारसंहिता असलेल्या क्षेत्रातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी आपापली शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यात जमा करावीत, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 22 जून ते 23 जुलै पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रातील शस्त्र परवाना धारकांची शस्त्रे ते ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहात असतील त्या पोलिस ठाण्यात जमा करावीत.

गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धुळे जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांची शस्त्रे आचारसंहिता कालावधीत संबंधित पोलिस ठाण्यात जमा होण्यासाठी पोलिस विभागाने विनंती केलेली आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तसेच धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समिती पोटनिवडणूकीच्या कालावधीत निवडणुका मुक्त व नि:ष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक आहे.

सार्वजनिक उपद्रव, नुकसान, जीवितास व आरोग्यास तसेच सुरक्षितपणास धोका निर्माण होवू नये आणि मतदारांत भय, दहशत निर्माण होवू नये म्हणून धुळे जिल्ह्यातील आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रातील सर्व शस्त्र परवाना धारकांनी त्यांनी धारण केलेल्या शस्त्र परवान्यावरील शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यात जमा करावयाची आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com