विखरण शिवारात आढळला बिबट्या

विखरण शिवारात आढळला बिबट्या

भुपेशभाईंनी विशेष पथक केले नियुक्त

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तालुक्यातील विखरण शिवारातील उसाच्या शेतात बिबट्या आढळला असून उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी तत्काळ दखल घेत विशेष पथक नियुक्त केले आहे. पथकामार्फत बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

काल दि. 25 जून रोजी विखरण येथील माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव पोपटराव पाटील यांना त्यांच्या उसाच्या शेतात सकाळच्या सुमारास बिबट्या दिसला. त्यांनी याबाबत उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांना माहिती दिली. बिबट्या दिसल्याने गावात खळबळ उडाली आहे.

उपनगराध्यक्ष भूपेशभाई यांनी घटनेची तत्काळ दखल घेवून वनखात्याशी संपर्क केला. तसेच बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ड्रोन कॅमेर्‍यासह विशेष पथक तयार करून वनखात्याच्या मदतीस पाठवले. दिवसभर वनखात्याच्या कर्मचार्‍यांसोबत पथकाने गावकर्‍यांचा मदतीने ड्रोन कॅमेर्‍याद्वारे संपूर्ण परिसर पिंजून काढला.

सायंकाळपर्यंत बिबट्या आढळून आला नाही. त्यानंतर वन कर्मचार्‍यांनी बिबट्या आढळलेल्या परिसरात चार ट्रॅप कॅमेरे लावले. ग्रामस्थांनी वन विभागास पिंजरा लावण्यास सांगितले.

शोध मोहिमेत वनपाल संदीप मंडलिक, वनरक्षक प्रशांत लांडगे, ज्ञानेश्वर शिरसाठ, वैशाली कुवर, भारती पावरा, प्राणीमित्र योगेश वारूडे, जि. प.चे माजी सदस्य वसंतराव पाटील, पं. समिती सदस्य सचिन पाटील, स्विस सहायक सुनील जैन, धिरज देशमुख, विखरणचे पोलीस पाटील राहुल पाटील, परिसरातील शेतकरी सचिन पाटील, प्रमोद पाटील, गणेश पाटील, प्रवीण चव्हाण, नितीन पाटील, शामकांत पाटील सहभागी होते.

उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी घटनेची दखल घेत तत्काळ उपाययोजना राबविल्याबद्दल त्यांचे विखरण परिसरातील शेतकरी बांधवानी विशेष आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com