शेणपूर शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला

शेणपूर शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

साक्री तालुक्यातील शेणपूर येथील शेतात आज सकाळी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

शेणपूर येथील जिभाऊ शंकर काळे हे त्यांच्या शेतीत गट नंबर42/1 येथे फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या बाभळाच्या झाडाखाली आढळून आला.

याबाबत त्यांनी पिंपळनेर वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण माळके हे पथकासह घटना स्थळावर पोहोचले. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सल्लयाने पिंपळनेर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हेमाडे यांना घटनास्थळी बोलावून बिबट्याचे शवविच्छेदन केले.

त्यात बिबट्या काही दिवसांपासून आजारी असून त्यास अतिसार झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. हेमाडे यांनी सांगितले. त्यानंतर पंचनामा करून घटनास्थळी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शेतकरी जिभाऊ काळे, वनाधिकारी अरुण माळके, वनपाल एम.एन.बच्छाव, वनरक्षक तानाजी कुवर, पवन ढोले, आशिफ शेख, काळू सिंग पवार, सागर सूर्यवंशी, वॉचमन दिनेश राऊत, वेलजी देसाई, अशोक चौरे, डॉ. हेमाडे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com