जुगार अड्यावर एलसीबीचा छापा
crime news

जुगार अड्यावर एलसीबीचा छापा

दोन लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त

दोंडाईचा - श. प्र. Dondaicha

शिंदखेडा पोलीस ठाणे (Shindkheda Police Thane) हद्दीत चिमठाणे-शेवाडे रस्त्यावर असलेल्या हॉटेल फौजीच्या पुढे बुटा अंकुश भिल यांच्या शेतात रात्रीच्या वेळी इन्व्हर्टरची बॅटरीच्या उजेळात काही इसम हे 52 पत्याच्या पानावर पैशाची पैज लावून जुगार खेळताना (LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार आड्यावर छापा टाकून 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 2 लाख 32 हजार 720 रुपये किमतीचा मद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास चिमठाणे गावापासून काही किलोमीटर अंतरावर चिमठाणे-शेवाडे रस्त्यावरील हॉटेल फौजी च्या पुढे बुटा अंकुश भिल यांच्या शेतात इन्व्हर्टरची बॅटरी लावून उजेडात १) अनिल लोटन बोरसे (वय.42 मु. पो. सरवड), २) अबुजर कुरेशी आजिम कुरेशी (वय.26 रा. कुरेशी मोहल्ला सोनगिर ), ३) खंडू रणजीतसिंग गिरासे (वय. 27, रा. बाजारपेठ चिमठाणे),४) प्रमोद राजेंद्र कोळी (वय.26 रा. वाल्मिक नगर शिरपूर), ५) गोरख रघुनाथ अहिरे (वय, 44 रा. नंदाणे), 6) सुयोग भानुदास बोरसे (वय 30 रा. सरवड), असे सांगितले. तसेच त्यांना शेतमालक व पळून गेलेले इसमांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव बुटा अंकुश भिल (रा.पिंपरी चिमठाणे) विजू दगडु भिल रा. दलवाडे असे सांगितले.

यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे मध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक विशाल भालचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक 1887 चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई योगेश राऊत, पोना संदीप सरग, कुणाल पानपाटील, पोकॉ रविकिरण राठोड, पोकॉ उमेश पवार, चापोकॉ दिपक पाटील आदींनी केली आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com