लक्ष्मीनारायण, कल्याणी नगरातील रस्त्यांवर साचले पाणी

लक्ष्मीनारायण, कल्याणी नगरातील रस्त्यांवर साचले पाणी

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील साक्रीरोडवरील (Sakri Road) महिंदळे शिवारातील (Mahindale Shivara) महापालिका हद्दीतील (Within the municipal limits) लक्ष्मीनारायण नगर, कल्याणी नगर, शिवतारा नगर येथील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे (Due to stagnant water on the roads) कच्च्या रस्त्यांमुळे चिखल झाला आहे. या परिसरातील रस्त्यांवर पायी चालणेही अवघड झाले आहे.

रस्त्यांवर गुडघ्याभर पाणी साचले आहे. पाण्याचा निचारा होण्यासाठी जागाच नाही. तसेच गटारी, पथदिवे व इतर सुविधांचा या नगरांमध्ये अभाव आहे. याकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आ. डॉ. फारुख शाह (MLA. Dr. Farooq Shah)यांच्याकडे गर्‍हाणे मांडले आहे.

आ. शाह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील महिंदळे शिवारात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून लक्ष्मीनायारण नगर, शिवतारा नगर, कल्याणी नगर वसले आहे. परंतू अद्याप पावेतो या नगरांमध्ये जाण्या-येण्यासाठी रस्ते नाहीत. कच्चे पायवाट असलेल्या रस्त्यांनीच वाहतूक होते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होतात. रस्त्यावर गुडघ्याभर पाणी साचते. ते पाणी 15 ते 20 दिवस ओसरत नाही.

त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. जेष्ठ नागरिकांना घराच्याबाहेर रस्त्यांअभावी बाहेर पडता येत नाही. एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यात सुध्दा नेता येत नाही. कच्च्या रस्त्यांमुळे नेहमी लहान-मोठे अपघात होतात. काही जणांचे हात, पाय फॅक्चर झाले आहेत. डोक्यालाही मार लागला आहे. या रस्त्यांवरुन पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. या नगरांमधून डीपी रोडवर जाणेही अशक्य झाले आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

या नगरांमध्ये विजेचे खांब आहेत त्या खांबांवर पथदिवेही लावण्यात आले आहेत. परंतू दिवे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. साप, विंचू व इतर विषारी प्राण्यांचा वावर या परिसरात जास्त आहे. त्यामुळे अंधारात नागरिकांना भिती वाटते. रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणेही अशक्य होते.

या तिघाही नगरांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यावर सांडपाणी साचते. पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होते. म्हणून मलेरिया, डेंग्यू यांचे रुग्ण जास्त प्रमाणात या परिसरात आढळून येतात. या परिसरात महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकत नाहीत. फवारणी, धुरळणी होत नाही.

या परिसरात रस्ते, गटारी, पथदिवे यांची सुविधा करावी. अशी मागणी या परिसरातील शेकडो नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महापालिका प्रशासनालाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. आतातरी महापालिकेने दखल घ्यावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com