विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील कुंडाणे गावातील शेत विहिरीत एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला. याबाबत तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत रमेश नान्हया पावरा (वय 48 रा.चाचरिया ता.सेंधवा, जि.बडवाणी, म.प्र., ह.मु. कुंडाणे) यांनी तालुका पोलिसात माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांच्यासह घरातील सर्व जण हे कामावर गेले होते.

तर त्यांची लहान सुन रोमीता रूपेश पावरा (वय 19) हीची प्रकृती बरी नसल्याने ती घरी होती. सोबत मोठ्या मुलाचे दोन लहान मुले होते.

सायंकाळी सहा वाजता घरी परतले असता त्यांना सुन रोमिता ही दिसली नाही. त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला.

रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्रकाश नानाजी पाटील यांच्या शेतातील विहीरीत रोमिता हिची साडी तरंगताना दिसली.

गावकर्‍यांच्या मदतीने रोमिताचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सपोनि काळे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com