तरूणाची हत्या करुन नवीन दुचाकीसह मोबाईल लांबविला

आयजी दौर्‍यावर असतांना मारेकर्‍यांची सलामी
तरूणाची हत्या करुन नवीन दुचाकीसह मोबाईल लांबविला

धुळे/सोनगीर ।Dhule ।

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर Special Inspector General of Police B.G. Shekhar हे जिल्हा दौर्‍यावर असतांना आज भरदुपारी शिंदखेडा तालुक्यात धारदार हत्यारांनी वार करत तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मारेकर्‍यांनी त्यांची नवीन दुचाकी व मोबाईल लंपास केला. पोळा सणानिमित्त शिंदखेडा येथून नवीन दुचाकी घेवून तरूण दराणे येथे घराकडे येत असतांना ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे. याबाबतरात्री उशिरापर्यंत शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

प्रेमसिंग राजेंद्र गिरासे Premsingh Girase (वय 21 रा. दरणे ता. शिंदखेडा) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो आज पोळा सणानिमित्त शिंदखेडा येथील दुचाकीच्या शोरुममध्ये नवीन दुचाकी घेण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत दोन मित्र ही होते. नवीन दुचाकी घेतल्यानंतर गिरासे याने जुनी दुचाकी मित्रांना चालविण्यासाठी देवून घरी परत येत होता. नवी दुचाकी सावकाश चालविण्यास सांगितल्यामुळे तो मित्र काही अंतर पुढे चालत होते.

गाव अवघ्या तीन कि.मी अंतरावर असतांना दरणे ते चिमठाणे रस्त्यावरील सबस्टेशन जवळ अज्ञातांनी त्याचा रस्त्यातच अडविले. धारदार हत्यारांनी वार करत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर नवीन दुचाकी व त्याचा मोबाईल घेऊन पसार झाले. हल्लयानंतर प्रेमसिंग गिरासे Premsingh Girase हा रस्त्याच्या थारोळ्यात पडून होता.

त्याला ये-जा करणार्‍यांनी तत्काळ जवळील चिमठाणे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापत असल्याने त्याला धुळे येथे घेवून जाण्यास सांगितले. मात्र रूग्णवाहिका असून त्याचा चालक नसल्यामुळे जखमींवर वेळेवर उपचार मिळू शकले नाही. अखेर एका खाजगी माल वाहु वाहनातून त्याला पुढील उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घराचा एकुलता-

दरम्यान मयत प्रेमसिंग गिरासे यांची घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची होती. तो घरातील एकुलता होता. त्याच्यावर घराची संपूर्ण जबाबदारी होती. तो नुकताच पशु चिकित्सक म्हणून कार्य सांभाळत होता.घरात सर्व सुखी समाधानी सुरु असतांना आज सणासुदीला त्यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

घटनेनंतर दरणे येथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनीही घटनास्थळी येवून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

ग्रामस्थांचा रास्तारोको

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, पोलिस निरीक्षक सुनिल भाबड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी मृताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे काहीसा तणााव निर्माण झाला होता.

तेव्हा पोलिस अधिक्षक पंडीत यांनी त्यांची समजूत काढली. जिल्ह्यातील प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावला जात असून या तरूणाच्या मृत्यूचे मलाही तेवढेच दुःख आहे. त्यामुळे आरोपी नरकात असले तरी त्यांना शोधून काढू. आरोपी नाही मिळाले तर नोकरीचा राजीनामा देईल, असे सांगितले. तेव्हा रास्तारोको मागे घेण्यात आला.

अवघ्या काही तासातच दोघांना अटक

घटनाघडल्यानंतर पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत Superintendent of Police Chinmay Pandit यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा पोलिस व एससीबीच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. काही पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना झाली. पथकांनी अवघ्या काही तासातच दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com