धुळे । प्रतिनिधी Dhule

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सहभागी होवु नये, म्हणून थेट शिरपूर तालुक्यातील साकवद येथील ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण केल्याची समोर आले आहे. याप्रकरणी शिरपुर शहर पोलिसात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्रा.पं. सदस्य दत्तु धना भिल (वय 50 रा.साकवद ता.शिरपुर) यांनी शिरपूर शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ते साकवद ग्रा.पं.च्या निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

दि.12 फेब्रुवारी रोजी होणार्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांनी सहभागी होवु नये, म्हणून त्यांना ते दि.11 रोजी सायंकाळी 4 वाजता शिरपुर शहरातील खंडेराव मंदिराजवळील नाना-नानी पार्कसमोरुन नातेवाईकांसोबत दुचाकीवर बसुन जात असतांना भुषण मोरे (रा.शिरपुर), लखन भिल (रा.रामसिंग नगर शिरपुर), सुनील उर्फ आप्पा भिवसन भिल (रा.तांडा ता.शिरपुर), व एक अनोळखी व्यक्ती अशा चौघांनी त्यांचे अपहरण केले.

सायंकाळी 4 ते दि.12 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. त्यानुसार, वरील चौघांविरुध्द भादंवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक एस.बी. आहेर करीत आहेत.