खेमराज शिंदेच्या संशोधनाला मिळाले पेटंट

डॉ. वाय. एल. भिरुड व शिंदे द्वयींच्या प्रयत्नांना यश
खेमराज शिंदेच्या संशोधनाला मिळाले पेटंट

धुळे Dhule। प्रतिनिधी

चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (Late Shri Neminath Jain Bramhacharyashram) संचलीत स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Kantabai Bhavarlal Jain Engineering College) स्थापत्य विभागाचे प्रमुख डॉ.वाय.एल.भिरुड (Dr. Y.L Bhirud)व त्याच विद्यालयातील विद्यार्थी खेमराज पांडूरंग शिंदे (Khemraj Pandurang Shinde) (कुणाल शिंदे) यांनी केलेल्या संशोधनाला पेटंट(patent) प्रदान झाले आहे.

या दोघांनी केलेले संशोधन हे स्वस्तिक पाईल फाउंडेशन या प्रकल्पावर आधारीत आहे. संशोधन पारंपारीक बांधकाम पद्धतीत नविन क्रांती घडवून आणणार असल्याचा विश्वास प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या स्वस्तिक पाईल फाउंडेशन या संशोधनाला इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफ इंडिया या संस्थेद्वारे पेटंट जाहिर करण्यात आले आहे. नवीन इमारतीच्या बांधकाम करण्यासाठी या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे.

पाईल फाऊंडेशन हे समुद्र काठाच्या काळ्या मातीच्या व नरम मातीच्या जमीनीवर उंच इमारती बांधण्याच्या खोल पायाचा प्रकार आहे. इतरांपेक्षा सरस आहे कारण इतर फाउंडेशन त्वचा, घर्षण व टोक भार सहन क्षमता या घटकांवर अवलंबून असते. तर स्वस्तिक पाईल फाऊंडेशनच्या काटेरी जोडणीमुळे त्याची भार सहन क्षमता जास्त आहे. याची भूकंप प्रतिरोधक क्षमता अधिक आहे तसेच इमारत पाया उभारणीचा खर्च कमी आहे.

कुसुंब्यातील खेमराज शिंदे याचे बालपणीच मातृछत्र हरपलेले असून त्याने अंत्यत सामान्य परीस्थितीतून एस. एन. जे. बी. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याच वेळी या प्रकल्पावर तो काम करीत होता.

वडील पांडूरंग शिंदे हे शेतकरी असून त्यांनी शेती करून आपल्या मुलाला शिकवले आहे. त्याने शिक्षक डॉ. वाय. एल.भिरूड, प्रा. ए. के. ठाकरे, प्रा. एच. ए. शिरसाठ तसेच सहकारी महेश काळे, लवकेश बोरा, आदेश म्हैसकर, आकाश गुगळे, आश्विनी आहेर, रीतेश गेलडा, आश्विनी ठाकरे, बॅच 2019/20 व कृषीवल फार्मा लिमीटेड यांचे आभार व्यक्त केले आहेत.

स्वप्न पुर्णत्वास माझे हे पहिले पेटंट आहे. खुप दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अजुन अनेक क्षेत्रांत पेंटट तयार करण्याचे ध्येय आहे.विषेषतः कृषी क्षेत्रासाठी पेटंट तयार करण्याचा मानस आहे. -कुणाल शिंदे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com