
कापडणे - Kapadane - प्रतिनिधी :
येथील बोरसे गल्लीतील 32 वर्षीय तरुणाचा मुंबई- आग्रा महामार्गावर मालेगावनजीक मोटर सायकल अपघातात मृत्यू झाला.
कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने गेली चार महिने हा तरुण येथे घरीच होता, गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांनी पुणे गाठले होते. पुणे येथे रोजगाराच्या शोधानंतर कापडण्याकडे परत येत असतांना हा अपघात झाला.
येथील कपिल रवींद्र बोरसे (वय 32) या तरुणाचा पुणे येथून कापडणे येथे परत येत असतांना काल दि.11 ऑगस्ट रोजी सायंकाळी मालेगाव जवळ अपघाती मृत्यू झाला. कपील बोरसे हा पुणे येथे नोकरीला होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे तो गेल्या चार महिन्यांपासून गावाकडे परत आला होता. गावात आल्यानंतर कपिल बोरसे याने मिळेल ते काम सुरू केले होते.
चार महिने उलटले आता कामाचा शोध घेतला पाहिजे यामुळे पुण्यात कामाला असलेल्या मोठ्या भावाचीही भेट होईल या निमित्ताने कपिल बोरसे तीन- चार दिवसांपूर्वी पुणे येथे गेला होता. भावाची भेट झाल्यानंतर दि. 10 रोजी तो पुणे येथून परत येत असतांना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मालेगाव जवळ झालेल्या मोटर सायकल अपघातात तो मृत्युमुखी पाडला.
कपिल बोरसे अतिशय मनमिळावू स्वभावाचे व्यक्तीमत्व होते. त्याच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कपिल बोरसे यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ व वहिनी असा परिवार आहे. कपील बोरसेंच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.