कापडणेत रंगली अहिराणी काव्यमैफील

कापडणेत रंगली अहिराणी काव्यमैफील

कापडणे - Kapadane - प्रतिनिधी :

कापडणे विधायक गृृप आणि मी कापडणेकर, मी पुणेकर गृृृृपतर्फे नुकतीच अहिराणी काव्य मैफल उत्साहात झाली.

त्यात शेतकरी, शेतमजूर, शेती, आई-वडील, बहिण, गाव, विवाह, हलाखीची परीस्थिती, साक्षरता, हुंडाबंदी, राजकारण, समाजकारण, घरातील पती-पत्नीतील भांडण, पोळा, नैसर्गिक सौंदर्य आदी विषयांवर एकसे बढकर एक बहारदार अहिराणी कविता सादर करून नवकवींनी कापडणेकरांची दाद मिळविली.

अडीच तास चाललेल्या या अहिराणी काव्यमैफिलीत अहिराणी साहित्य किती दर्जेदार आहे, याची प्रचितीही श्रोत्यांना आली. पाडव्याच्या रात्री झालेल्या या अहिराणी काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थांनी निवृत्त मुख्याध्यापक आणि अहिराणी कवी रोहीदास पाटील हे होते.

यावेळी विनय विद्यालयाचे अध्यक्ष संजय पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भटू पाटील, महेंद्र भामरे, रमेश पाटील, दिलीप पाटील, गजेंद्र माळी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

काव्य मैफलीत चोवीस अहिराणी कवींनी सहभाग नोंदविला. त्यात जितेंद्र चौधरी, जगन्नाथ पाटील, संतोष एंडाईत, नितीन वाघ, रोहीदास पाटील, दिलीप पाटील, महेंद्र भामरे, तलाठी मनोहर पाटील, रमेश पाटील, राजेंद्र भामरे, विजय माळी, मनोजकुमार पाटील, प्रा. रामकृष्ण पाटील, अभियंता मनोज पाटील, नितीन वाघ, मनोहर पाटील, विजय माळी, शामल पाटील, भूषण ब्राम्हणे, योगेश अत्रेय आदी कवींनी बहारदार कविता सादर केल्या.

संमेलनाचे प्रास्ताविक जगन्नाथ पाटील यांनी केले. जितेंद्र चौधरी आणि संतोष एंडाईत यांनी सुत्रसंचलन केले. हेमंत चौधरी यांनी आभार मानलेत.

बहारदार कवितांचे सादरीकरण

केंद्र यावेळी बहारदार कविता सादर करण्यात आल्या. त्यात नात बयीन भाउन याले उपमा नयी प्रेम इतल गहीर्र कोणता नातामा नयी, जन्म दिना मायनी माय पयला गुरु ईसरु कशी बाप मना कल्पतरु, येववर पाणी पडस नयी पयरेल उगन नयी, संसार संसार मना भात्या एवढा संसार र्हायन नयी घरदार, देखा दुनियादारी भर दुपारले व्हस चोरी, असा कसा उलटा जमाना सुनबाई सासून चालू देईना, शेतकरी जगना पोशिंदा र्हास म्हणे आदी बहारदार कवितांनी श्रोत्यांची मने जिंकलीत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com