शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

शिरपूरात जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळला आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाच्या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य रुग्ण वाढत आहेत. त्यावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शहरातील सर्व आस्थापना (दवाखाने, मेडिकल वगळता) बंद राहतील, शिरपूर प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आदेश 14 मार्च सायंकाळी सहा वाजेपासून 17 मार्च सकाळी सहा वाजेपर्यंत घोषीत केलेला आहे.

सर्वांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे. आदेशाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.