महात्मा गांधी चौकातील ध्वजस्तंभावरून तिरंगा ध्वज गायब का?

महात्मा गांधी चौकातील ध्वजस्तंभावरून तिरंगा ध्वज गायब का?

धुळे Dhule| प्रतिनिधी

शहरातील महात्मा गांधी चौकात Mahatma Gandhi Chowk सुमारे ८० लाख रुपये खर्चातून चौक सुशोभित करून तिरंगाध्वज Tricolor उभारण्यात आला. मात्र सध्या या स्तंभावर तिरंगा ध्वज नाही. तो गायब होण्यामागे गौडबंगाल काय? असा सवाल करीत महानगर शिवसेनेच्या Mahanagar Shiv Sena वतीने स्वातंत्र्य दिनी या ठिकाणी भारत मातेचे पूजन करुन राष्ट्रगीत होणार आहे. मनपा प्रशासनाच्या Municipal administration विरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सेनेने म्हटले आहे.

घाई गर्दीत गाजावाजा न करता महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खा.सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन देखील झाले. त्यानंतर ८/१५ दिवस तिरंगा अतिशय डौलाने फडकत होता आणि फडकताना तिरंगा पाहून धुळेकर नागरिकांचा उर दाटून येत होता. परंतु काही दिवसातच या स्तंभावरून गायब झालेला तिरंगा आज पर्यंत डौलाने फडकतांना दिसला नाही.

या मागील गौडबंगाल काय? यामुळे स्वातंत्र्यदिनी या ध्वजस्तंभावर निरंतर आणि कायम डौलाने फडकणारा तिरंगा नसेल तर धुळे मनपाचा निषेध म्हणून याच ध्वजासमोर माजी सैनिकांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून व राष्ट्र्गीत म्हणून सलामी देणार असल्याचे सेनने म्हटले आहे. या आशयाचे निवेदनही मनपा प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी अतुल सोनवणे, हिलाल माळी, किरण जोंधळे, मनोज मोरे, डॉ.सुशील महाजन, बबन थोरात, प्रवीण साळवे, संदीप सूर्यवंशी, रामदास कानकाटे, दिनेश पाटील, मच्छीन्द्र निकम, राजेश पटवारी, संजय वाल्हे, सचिन बडगुजर, प्रकाश शिंदे,कुणाल कानकाटे, केशव माळी, पंडित जगदाळे, जितू जैन आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com