साक्री तहसील कार्यालय
साक्री तहसील कार्यालय
धुळे

साक्री : तहसील व पंचायत समिती कार्यालयात करोनाचा शिरकाव

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

साक्री - Dhule - Sakri - प्रतिनिधी :

साक्री शहरातील शासकीय कार्यालयामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने तहसील आणि पंचायत समिती बंद ठेवण्यात आले असून तहसील कार्यालय दि.20 ते 22 जुलै रोजी पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश तहसीलदार प्रविण चव्हाणके यांनी काढले आहेत.

तहसील कार्यालयात एक तर पंचायत समिती मधील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने पंचायत समिती कार्यालय सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची संख्या शहरासह तालुक्यात वाढतच आहे. दि 1 ऑगस्ट पर्यंत दवाखाने, मेडिकल वगळता सर्वच व्यवहार बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील खेडेगावासह शहरातील कॉलनी परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहेत.

तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील 55 वर्षीय कर्मचारी व आरोग्य विभागातील 40 वर्षीय कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आले आहेत. सर्वात जास्त कोरोना बाधितांची संख्या कासारे गावात वाढत आहे. तर उंभर्टी येथील 60 वर्षीय पुरूष, वासखेडी येथील 40 वर्षीय पुरुष, साक्री शहरातील नयना हाऊसिंग सोसायटी 55 वर्षीय पुरुष, गजानन कॉलनी 58 वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर साक्री येथील नयना सोसायटी,आनंद नगर,गजानन कॉलनी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तींच्या परिसरात तसेच पंचायत समिती कार्यालयात देखील फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तर तहसील कार्यालयातही फवारणी करण्यात आली आहे.

साक्री शहरातील प्रमुख दोन्ही कार्यालयात कोरोनाने शिरकाव केल्याने नागरिकांनासह कर्मचार्‍यांनमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com