कारचा अपघात; उद्योगपती तपनभाई पटेल ठार

मुकेशभाई पटेल यांचे पुत्र होते तपनभाई
तपनभाई पटेल
तपनभाई पटेल

शिरपूर : Shirpur

कारचा भीषण अपघात होऊन येथील नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल (वय 39) यांचा काल मध्यरात्री मृत्यू झाला.

सावळदे (ता.शिरपूर) येथील एनएमआयएमएस कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कारचा (एमएच 18 एएक्स 8) अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने त्यांना येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू केल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून गेले होते.

तपनभाई पटेल हे आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे उपाध्यक्ष, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. राज्यसभेचे माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र, माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com