पेट्रोल पंपातून तीन हजार लिटर डिझेल लंपास

पेट्रोल पंपातून तीन हजार लिटर डिझेल लंपास

नगाव शिवारातील पेट्रोल पंपवरील घटना

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून तालुक्यातील नगाव शिवारातील पेट्रोल पंपातून (Petrol pump) चोरट्यांनी तब्बल तीन हजार लिटर डिझेल (Diesel) लंपास केले. काल रात्री ही घटना उघडकीस आली.

शहरातील (Agra Road) आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज (Bombay Lodge) जवळ राहणारे व्यापारी आशिष मुरलीधर पटवारी (वय 19) यांचे नगाव शिवारातील ए.आर.ए कॉलेज ऑफ फार्मसीच्या बाजुला आशिष नावाचा पेट्रोल पंप आहे. काल पहाटे चार वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पेट्रोल पंपातून चोरट्यांनी तब्बल 3 हजार लिटर डिझेल चोरून नेले. त्यांची किंमत 2 लाख 61 हजार 421 रूपये आहे. सकाळी सात वाजता हा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी पश्‍चिम देवपूर पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ शेख करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com